आणि आ. परिचारकांनी थोपटले दंड

सोशल मीडियावर मात्र समर्थकांच्या कुस्त्या

2019 साली विजयानंतर भारत1भालके2यांनी दंड थोपटले होते.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे हे विजयी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून आ. प्रशांत परिचारक यांनी दंड थोपटून विजयाचा जल्लोष साजरा केला होता. परिचारक यांची ही कृती भालके आणि यांच्या कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागलेली दिसत आहे. आज दिवसभर सोशल मिडियावर यावरून समर्थकांच्या कुस्त्या भिडल्या आहेत.

आमदार भालकेंचा हाबडा आणि आ.परीचारकांचा दंड ! (दोन्ही व्हीडिओ बघा आणि चॅनेल सबस्क्राईब करा)

1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ पाटील यांना स्वर्गीय माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पराभूत केले. राजाभाऊ पाटील हे माजी आमदार औदुंबर पाटील यांचे चिरंजीव, पाटील कुटुंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानणारे मात्र 1995 च्या निवडणुकीत राजाभाऊ पाटील यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढवली. या निवडणूकीत परिचारक यांनी पाटील यांचा पराभव केला होता. निकालानंतर परिचारक यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि साहेब, तुमच्या राजाभाऊला हरवून मी जिंकून आलो, हे सांगताना परिचारक यांनी दंड थोपटले होते.


परिचारक यांच्या या कृतीची भारत भालके यांच्या मनात सल होती. कारण भालके हे औदुंबर पाटील यांच्या विठ्ठल परिवाराचे सदस्य होते. या बदलाच्या संधीची ते वाट पहात होते.
आणि 2019 विधानसभा निवडणुकीत सुधाकर परिचारक व भारत भालके हे आमने सामने आले या निवडणुकीत भालके यांनी परिचारक यांचा पराभव करीत विजयाची बाजी मारली.
निवडणूक निकालानंतर भालके यांची विजयी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात पोहचली तेव्हा महाराजांना अभिवादन केल्यानंतर आ. भालके यांनी औदुंबर पाटील, यशवंत पाटील आणि राजाभाऊ पाटील यांच्या पराभवाचा हा वचपा आहे असे सांगत दंड थोपटले.

मात्र परिचारक यांच्या या दंड कृतीने आज दिवसभर पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठा हलकल्लोळ उडवला आहे. भगीरथ भालके यांनी परिचारक यांना 2024 साली निवडणुकीत उतरा आणि दंड थोपटा असे आव्हान दिले तर त्यांच्या समर्थकांनी परिचारक यांच्या दंड थोपटण्याची खिल्ली उडवत सोशल मीडियात उपरोधिक स्टेटस, पोस्ट्स आणि कॉमेंट्स चा धुरळा उडवून दिला आहे. तर परिचारक समर्थकांनी ही 2019 च्या भालके यांच्या कृतीवर जाब विचारत उलट उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदर पंढरपूर तालुक्यात निकालाच्या दुसऱ्या दिवशी निवडणुकीवर चर्चा होण्याऐवजी परिचारक यांचे दंड थोपटने आणि भगीरथ भालके यांनी त्यांना आव्हान देणे यावर जोरदार2कुस्त्या रंगल्याच दिसून आले.


स्वर्गीय भारत भालके हे हयात होते तोपर्यंत परिचारक कुटूंबाने दंड थोपटने तर दूरच साधा हात वर करण्याचे धाडस केले नाही.
त्यांच्या पश्चात दंड थोपटणे हे मर्दुमकीचे लक्षण नाही. मुळात दंड हे मैदान गाजवून आलेल्या पैलवानाने थोपटायचे असतात जिंकून आलेल्या पैलवानाला तेलाने मसाज केला म्हणून मालिशवाल्याला दंड थोपटण्याचा अधिकार नाही. तुम्हाला दंड थोपटण्याची एवढीच खुमखुमी असेल तर 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरा तुम्हाला तिसऱ्यांदा पराभवाची धूळ नाही चारली तर भारत भालकेचे नाव लावणार नाही अशा तिखट शब्दांत भगीरथ भालके यांनी आ.परिचारक यांना आव्हान दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!