महाविकास आघाडीच्या पाय गुणाने कोरोना आला

आ.परिचारक यांची हुंनूर येथे टीका

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले, मात्र त्यांच्या पायगुणाने राज्यात कोरोना आला. दोन तारखेला या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी तर, होणारच शिवाय कोरोना आणि राज्यातील सरकार जाणार आहे, याबाबत लिहून ठेवा असा दावा भाजप आ. प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील हुन्नूर येथे प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला.


यावेळी आ. गोपीचंद पडळकर, माजी आम. बाळा भेगडे ,आ रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, औदुंबर वाडदेकर, सोमनाथ आवताडे, शशिकांत चव्हाण, माजी सभापती प्रदीप खांडेकर,शिवाजी पटाप, सचिन शिवशरण, प्रा.येताळा भगत, दत्तात्रय जमदाडे उपस्थित होते.


33 टक्के मत पडलेला उमेदवार पास होतो आणि 67 टक्के मते पडलेला उमेदवार नापास होतो, त्यामुळे यापुढील काळात दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली जात आहे. राज्यातील परिवर्तनाला सुरुवात या मतदारसंघातून होणार आहे त्यामुळे लोकांनी विकासाच्या दृष्टीने समाधान दादाला विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे, असे आवाहन करून आ.परिचारक पुढे म्हणाले, ही लढाई महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अशी आहे. राज्यातील एकमेव निवडणूक असल्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबतचा दावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. स्व भालकेच्या पश्चात जर उमेदवारी त्यांच्या पत्नी दिली असती तर भाजपाने ही जागा बिनरोध केली असती, मात्र रामायणामध्ये एका मुलाचे राज्य आईने काढल्याचे ऐकतो पण इथे मात्र आईचे राज्य मुलांने काढून घेतले, मीच कसा लायक आहे दाखवत शिष्टमंडळ पाठवून काढून घेतल्याचा आरोप यावेळी केला.

https://chat.whatsapp.com/IcMfmYWcFIs7jgNSzE3k28

ताज्या आणि विशेष बातम्यांसाठी वरील लिंकवरून आमच्या व्हाट्स अप ग्रुपमध्ये सामील व्हा.

Leave a Reply

error: Content is protected !!