आ.रणजितसिंह मोहिते पाटील कोरोना पॉझिटिव्ह

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भारतीय जनता पक्षाचे नेते आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते सध्या होम क्वारन्टीन झाले आहेत. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या नी तपासणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

माझी कोरोनाची टेस्ट आज पाॅझीटीव्ह आली आहे त्यामुळे मी क्वारंटाईन मध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपणही आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्या व स्वतःची काळजी घ्या.

आपला,

रणजितसिंह मोहिते पाटील,
विधान परिषद सदस्य,

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक सुरू असून गेल्या 10 दिवसांपासून मोहिते पाटील यांनी आघाडीवर राहून भाजपचा प्रचार केला आहे. मात्र प्रचार शिगेला पोहोचला असताना आ.मोहिते पाटील यांना कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्यानंतर तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यासंदर्भात माहिती देऊन मोहिते पाटील यांनी आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळवले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!