स्वःकर्तृत्वावर आ. सावंत पुन्हा विजयी होतील : वांगीकर

दत्तात्रय सावंत यांचा प्रचार जोमात

टीम : ईगल आय मीडिया

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात दत्तात्रय अच्युतराव सावंत हे एकमेव उमेदवार आहेत की जे चळवळीतून संघर्षातून पुढे आले आहे, त्यांनी सातत्याने विद्यार्थी-शिक्षक केंद्रबिंदू मानून अहोरात्र काम केले आहे, त्यामुळे स्वःकर्तृत्वावर आ सावंत हेच पुन्हा विजयी होतील असा विश्वास राज्य शाळा कृती समितीचे अध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी व्यक्त केला. राज्य शाळा कृती समितीचे व इतर समविचारी शिक्षक संघटनेचे उमेदवार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रचारार्थ सभेत गुरुनाथ वांगीकर बोलत होते. यावेळी सरदार नदाफ, शंकर वडणे, एजाज शेख आदी उपस्थित होते.

विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षक मतदारसंघातून चळवळीतून व संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रय सावंत यांना२०१४ मध्ये उभा करण्यात आले होते, त्यावेळी ते विजयी झाले होते व विधानपरिषद सभागृहात सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा त्यांना उमेदवारी दिली असून यावेळी ही दत्तात्रय सावंत हे स्वःकर्तृत्वावर पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आम्हाला असल्याने गुरुनाथ वांगीकर यांनी सांगितले.

एका दिवसात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात सर्व शाळांपर्यंत पोहोचणारी एकमेव शिक्षक संघटना ही राज्य शाळा कृती समिती आहे, आमच्या संघटनेचे कार्यकर्ते प्रत्येक शाळेत आहेत, त्यामुळे आमच्या संघटनेचे उमेदवार दत्तात्रय सावंत हे ३५ हजारांपेक्षा जास्त मते पहिल्या पसंतीची घेऊन विजयी होतील असा विश्वास अध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी व्यक्त केला.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवाळी सुट्टी असल्याने राज्य शाळा कृती समितीच्या बैठकीत कोरोनाच्या काळात शिक्षकांना एकत्र बोलावून सभा घेण्यापेक्षा आपण त्यांच्या घरापर्यंत जाऊन होम टू होम प्रचार करावा असा निर्णय घेण्यात आला होता, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून दत्तात्रय सावंत व शिक्षक कुटुंबाचे एकप्रकारे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.

दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराची धुरा संघटक समाधान घाडगे, कल्याण बरडे, राजेंद्र आसबे, मारुती गायकवाड, नितीन जाधव, विजय येवले, प्रसाद गायकवाड, सचिन नलवडे, समाधान दुधाट, अनंत गर्जे, सरदार नदाफ, तुकाराम मस्के, विकास शिंदे, मोहन वाघ, बिभीषण साळुंखे यांनी सांभाळली आहे. शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्ष किंवा संस्थाचालक संघटना उमेदवार उभा करून दबाव टाकण्याचे काम करीत आहेत, परंतु शिक्षक हे आपल्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या सावंत यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतील.

Leave a Reply

error: Content is protected !!