आ.परिचारक यांच्या जागेची निवडणूक लांबणीवर

जानेवारीपासून आमदारकी रिक्त राहणार ? : झेड पी, नगरपालिका निवडणुकी नंतर होणार लढाई

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र यावेळी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था जागेची निवडणूक तांत्रिक कारणामुळे होणार नाही. ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्य विधानपरिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्ठात येत आहे.मात्र यामध्ये सोलापूर आणि अहमदनगर या दोन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 75 टक्के हुन अधिक मतदार जागा रिक्त आहेत. त्यामुळे या जागांवर निवडणूक घेता येणार नाही. त्याशिवाय मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर
अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर
मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
मतमोजणी : 14 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 डिसेंम्बर

10 डिसेंम्बर रोजी रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे.तर 14 डिसेंम्बर रोजी मतदान होणार आहे.

मात्र सोलापूर स्थानिक स्वराज संस्था जागेची निवडणूक होणार नाही. पुढील वर्षी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे 1।जानेवारी नंतर ही जागा रिक्त राहणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!