मनसेच्या मनीष धुरींचाही धक्कादायक खुलासा
टीम : ईगल आय मीडिया
धनंजय मुंढे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याविरोधात भाजपच्या कृष्णा हेगडे पाठोपाठ मनसेच्या मनीष धुरी यांनीही आपल्यावर रेणू शर्माने हनी ट्रॅप चा प्रयत्न केल्याचा आरोप खाजगी वृत्तवहिनी शी बोलताना केला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी नुकताच केला आहे. यानंतर आता या प्रकरणात आणखी मनसेचे नेते मनीष धुरी यांचे नाव पुढे आलं आहे. धुरी यांनीही आपल्याला याच महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या एकाच महिलेने तीन राजकीय व्यक्तींना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे.
मनसे नेते मनीष धुरी यांनी एबीपी माझावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनं माझा नंबर कुठूनतरी मिळवला आणि ती मला फॉलो करत होती. तिने माझ्याशी अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्या लोकांना हेरायचा ती प्रयत्न करत असल्याचं मला कळालं होतं म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. २०१८-१९ मध्ये ही महिला पैसे उकळण्यासाठी पुन्हा माझ्या संपर्कात आली. मी ही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. आत जर हेंगडेंनी या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे तर मी देखील तक्रार दाखल करणार आहे.”