मनसेचे श्याडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांच्या हस्ते मोळी पूजन
टीम : ईगल आय मीडिया
मोहा ( ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेंकर ऍग्रो या कारखान्याचा दुसऱ्या गळीत हंगामाची सुरुवात मनसेचे प्रदेश सरचिटणीस, शाडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते चेअरमन हनुमंत तात्या मडके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रात आदर्शवत असा हा कारखाना असून कारखान्याचा हा दुसरा गळीत हंगाम आहे, पहिल्या वर्षीच फायद्यात असणाऱ्या या कारखान्याने सर्व शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे दिले आहेत. चेअरमन हनुमंत मडके यांचे नियोजन कौतुकास्पद असून या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी कारखान्याची उभारणी केली आहे.
यावेळी चेअरमन हनुमंत मडके म्हणाले की, या भागातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, त्याच बरोबर इतर करखान्या प्रमाणे यावर्षीही चांगला दर दे अशी ग्वाही देऊन या भागातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक नवीन उद्योग उभा करण्याची घोषणा मडके यांनी केली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते बॉयलरचे ही पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक संतोष मडके, मोहेंकर मल्टी स्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके, संचालक बापूराव शेळके, आनंद शेठ, मोहाचे उपसरपंच सोमनाथ मडके, अनंत मडके, संजय मडके, प्रमोद मडके, धनंजय मडके,जोशी, अरकडे सर,कारखान्यातील सर्व कर्मचारी, शेतकरी सभासद इत्यादी उपस्थित होते.