मोहोळच्या विकास कामासाठी ग्रामविकासकडून १ कोटी रुपयांचा निधी मंजुर

राजू खरे यांचे मागणीनुसार एक कोटींचा निधी मंजूर

पंढरपूर : ईगल आय न्यूज

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावच्या विकास कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यामुळे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि मोहोळ विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी दिली.

मोहोळ विधानसभा मतदार संघातील विकास कामासाठी राजू खरे यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागामार्फत एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मोहोळ मतदारसंघातील हराळवाडी उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी, रानमसले, मोहोळ तालुक्यातील राम हिंगणी, कोरवली, पंढरपूर तालुक्यातील चळे, नेपतगाव, फुलचींचोली, सर्कोली,ल आदी दहा गावच्या रस्ते, समज मंदिर, ग्रामसचिवालय, पेव्हर ब्लॉक, अशा विकास कामासाठी निधीस मंजुर करण्यात आला असून, यापुढील काळातही आणखी निधी मंजूर करून घेणार असल्याचेही राजू खरे यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना खरे म्हणाले की, मोहोळ मतदार संघातील विकास कामासाठी, यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ती कामे सुरू आहेत. यानंतरही विविध गावातील नागरिकांच्या मागणीनुसार २५\१५ योजने अंतर्गत ही कामे मंजूर करण्यात यावीत, अशी मागणी मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केली होती. मंत्रालय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यास यश आले असुन, मोहोळ मतदार संघातील १० गावामध्ये १ कोटी रुपयांचे कामास मंजुरी मिळाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!