मोहोळ मध्ये यशवंत माने पराभवाच्या छायेत

प्रथमच दुरंगी लढत असल्याने राजू खरे यांची मतदार संघात हवा

पंढरपूर : प्रतिनिधी

मोहोळ विधानसभा मतदारसंघात यंदा थेट दुरंगी लढत होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार यशवंत माने हे पराभवाच्या छायेत असल्याचे रिपोर्ट्स येऊ लागले आहे. आजवर माजी आ. राजन पाटील यांच्या गटाचे उमेदवार मतविभागणीचा लाभ घेऊन जिंकत होते.मात्र यंदा अशी मोठी मत विभागणी होणार नाही, त्यातच राजू खरे यांनी तीन वर्षांपासून ग्राउंड लेव्हल वर काम केल्याने त्यांच्या विजयाचे गणित मांडले जाऊ लागले आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.यशवंत माने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांच्यात थेट लढत होत आहे. अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा राजू खरे यांना दिला असल्याने खरे यांचे पारडे जड झाले आहे.

आजवर प्रत्येक निवडणुकीत विरोधी मतांमध्ये विभागणी होईन राजन पाटील यांचा उमेदवार विजयी होत होता. मात्र यंदा मोठी मत विभागणी होण्याची शक्यता नाही. मोहोळचे जागा अनुसूचित जाती साठी राखीव असून राजू खरे हे मूळचे अनुसूचित जाती मधील उमेदवार आहे तर यशवंत माने हे कैकाडी समाजातील असल्याने अनु जातीचे सर्व मतदार राजू खरे यांच्या पाठीशी उभा राहिले आहेत.

राजू खरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. तुतारी या निवडणूक चिन्हांची, खा. शरद पवार यांची जबरदस्त क्रेझ आल्याने राजू खरे यांनी हवा झालेली आहे. त्यातच मतदार संघातील बळीराम काका साठे, विजयराज डोंगरे, उमेश पाटील, दीपक गायकवाड, संजय क्षीरसागर, रमेश बारसकर, मानाजी माने, सतीश जगताप, चरणराज चवरे, महाडिक यांचा भीमा परिवार आदी राजन पाटील विरोधक सर्व राजकीय नेते प्रथमच मोठ्या ताकदीने एकवटले आहेत.


मलिदा गँग माने यांच्यासाठी ठरणार डोकेदुखी

आमदार यशवंत माने यांनी पाच वर्षात गावोगावी ठेकेदार पुढाऱ्यांना हाताशी धरून कामे केली. ठेकेदाराच्या कामातून मलिदा मिळवलेल्या गाव पुढाऱ्यांनाच माने यांनी मान, सन्मान दिला. त्यांच्याशी संपर्क ठेवला आणि सामान्य कार्यकर्त्यांशी, जनतेशी माने यांची नाळ जुळली नाही. त्यामुळे माने यांच्या विषयी मलिदा गँग वगळता सामान्य मतदारातून नाराजी आहे. ही नाराजी आ.माने यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे माने यांचा पराभव निश्चित मानला जातो आहे.

त्यामुळे अनगर वगळता सर्व मोहोळ तालुका, उत्तर सोलापूर तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील १७ गावातून राजू खरे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. २००९, २०१४, २०१९ या तिन्हीही निवडणुकीत राजन पाटील यांच्या विरोधी मता मध्ये फूट झाली आहे. आणि त्याचा फायदा राजन पाटील यांच्या उमेदवारास मिळत होता. यावेळी मात्र मतविभागणी होणार नाही, सर्व विरोधी ताकद एकत्र झाली आहे. त्यामुळे यावेळी यशवंत माने यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.


मोहोळचे अप्पर तहसील कार्यालय स्थलांतरीत केल्याने प्रचंड नाराजी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजन पाटील यांच्या इशाऱ्यावर मोहोळचे अप्पर तहसील कार्यालय अनगरला हलवण्यात आले आहे. यामुळे यशवंत माने यांच्याविषयी संपूर्ण तालुक्यात प्रचंड नाराजी आहे. अप्पर तहसील कार्यालय अनगरला पळवल्याची नाराजी यशवंत माने यांना पराभूत करणार असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

error: Content is protected !!