मोहोळ विधानसभा मतदारसंघात निधी मिळाला राजू खरे यांच्या प्रयत्नातून

आ.यशवंत माने – पाटलांनी केली स्वतःची जाहिरात

पंढरपूर : ईगल आय न्यूज

मोहोळ तालुक्यातील काही ग्रामपंचायती भवनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना नेते राजू खरे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीची जाहिरात करून राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) चे आमदार यशवंत माने यांनी जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे निधी आणला एकाने, श्रेय घेतोय दुसराच अशी चर्चा मोहोळ विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे.

शिवसेना नेते आणि उद्योजक राजू खरे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खरे यांनी मोहोळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केलेला आहे. या ग्रामपंचायती भावनासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत निधी मंजूर केला आणि त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठविले, त्यामुळे या ग्रामपंचायत कार्यालयाच्या मंजूर कामासाठी राजू खरे यांनी पाठपुरावा केलेला आहे.

याच दरम्यान राज्यभरातील अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत भवनासाठी या योजनेअंतर्गत अर्ज दाखल केले होते. जिल्ह्याच्या नियोजन बैठकीत तसेच लोकप्रतिनिधीला येणाऱ्या कामकाज पत्रांमध्ये या योजनांचा उल्लेख झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक आमदारांनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची शिफारस केली.


तत्पूर्वी ही योजना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असल्यामुळे आणि यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना हक्काचे भवन उभा राहून तेथे वंदनीय साहेबांचे नाव पोहोचेल यामुळे या योजनेबाबत खरे यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. त्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मोहोळ तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीसाठी सुमारे पावणेतीन कोटीचा निधी देण्याचा निर्णय झाला.

मात्र माजी आमदार तसेच विद्यमान आमदार यांनी याबाबत तांत्रिक प्रस्ताव पाठवला, परंतु त्याचा पाठपुरावा करून त्यावर स्वतः मुख्यमंत्र्याची इंडसमेंट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत येण्याबाबत श्री.खरे यांनी मोलाचे प्रयत्न केले.
अद्यापही याबाबतचा निधी मिळाला नाही किंवा अंतिम मंजुरी नंतर त्याचे कुठलीही कार्यवाही झाली नाही, परंतु याबाबतचे अध्यादेश समजल्यामुळे येथील आमदारांनी याची जाहिरात बाजी सुरू केली. या सर्व जाहिरातबाजीमुळे कष्ट कोणाचे आणि श्रेय कोण घेतो ? असा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!