शिवसेना नेते राजाभाऊ खरे : दोन महिन्यात सर्व कामे पूर्ण होतील : वंचित गावांना प्राधान्य
पंढरपूर : eagle eye news
मोहोळ – पंढरपूर- उत्तर सोलापूर राखीव विधानसभा मतदार संघातील विकासापासून वंचित असणाऱ्या १७ गावांसाठी सुमारे ६ कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत. लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाच्या शुभारंभाचे नारळ फुटतील आणि दोन महिन्यात हि कामे पूर्ण होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे तसेच रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्याने हि कामे मिळाली असल्याची माहिती शिवसेनेचे नेते राजाभाऊ खरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ विधानसभा मतदार संघातील मंजूर विकास कामाची माहिती देण्यासाठी राजाभाऊ खरे यांनी पत्रकार परिषद गोपाळपूर येथे आयोजित केली होती. यावेळी सौ. तृप्तीताई खरे, सामाजिक कार्यकर्ते विजय खरे, गोपालपूरच्या माजी उपसरपंच उज्वला बनसोडे, युवा सेनेचे उत्तर सोलापूर तालुका प्रमुख आकाश गजघाटे, सोनू शिंदे, नेमिनाथ शिरसाट, आकाश फडतरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना राजाभाऊ खरे म्हणाले कि, मोहोळ विधानसभा मतदार संघात फिरत असताना येथील प्रस्थापित नेत्यांनी जाणीवपूर्वक अनेक गावांना विकासापासून वंचित ठेवलेले दिसून आले. विशेषतः ज्या गावातून नेहमीच शिवसेनेला मताधिक्य मिळते अशा गावांना रस्ते, पाणी, शाळा या मूलभूत सुविधा सुद्धा मिळणार नाहीत यासाठी प्रस्थापितांनी प्रयत्न केले आहेत. अनेक गावातील कामांचे तीन तीन वेळा नारळ फोडले परंतु कामे होऊ दिली माहिती.
त्यामुळे अशा विकासापासून वंचित गावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे ग्रामीण रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, आ. भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्याने ९५/५ मधून २ कोटी १५ लाख रुपये आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्राम समृद्धी पाणंद योजनेअंतर्गत रस्त्यांसाठी ३ कोटी ७२ लाख असे ५ कोटी ८७ लाख रुपये २५ जानेवारी रोजी मंजूर केले आहेत.
९५/५ योजनेतून मोहोळ मतदार संघातील औंढी, तारापूर, दादपूर, बेगमपूर, रामहिंगणी, कमती बु. वडदेगाव, हराळवाडी, खरसोळी, चळे, गोपाळपूर या गावांतील सिमेंट काँक्रीट रस्ता, संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक बसवणे यासाठी प्रत्येक गावात २० कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर केले आहेत, तर गोपाळपुरसाठी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन १२ पाणंद रस्त्यासाठी बेगमपूर, वडदेगाव, मार्डी, होणसाळ, हगलूर, रान मसले, कौठाळी ( ता. उत्तर सोलापूर ) या गावात २४ ते ४८ लाख रुपये प्रत्येक गावासाठी मंजूर झालेले आहेत.
येत्या महिना भरात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून दोन महिन्यात हि कामे पूर्ण होतील. तसेच व्यक्तिगत खर्चातून मागील सहा महिन्यात १५ रस्त्यांचे मुरुमीकरण, आणि बोअरवेल पाणी पुरवठा सोय केलेली आहे, याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यातून वैद्यकीय उपचारासाठी अनेक गरजूना मदत केलेली आहे. यापुढील काळातही मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत, असेही खरे यांनी सांगितल