पंढरीत शासकीय हमीभाव मका खरेदी ऑनलाईन नांव नोंदणी सुरू


तालुका खरेदी विक्री सह संघाकडे नाव नोंदणीची मुदत 15 ऑक्टोबर


पंढरपूर : ईगल आय न्यून

शासनाने हमीभाव खरेदी योजने अंतर्गत दि.१५ ऑक्टोबर अखेर मका, ज्वारी व बाजरी उत्पादक शेतकरी बांधवांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी असे आवाहन पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


 यासाठी शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा, मका, ज्वारी व बाजरी पिकाची नोंदीसह, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जमा करून ऑनलाईन नांव नोंदणीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत कालावधी निश्चित केला आहे. मका या शेतीमालासाठी शासकीय हमीभाव १ हजार ९६२ प्रति क्विंटल, ज्वारी हायब्रिड २ हजार ९७० रुपये प्रति क्विंटल ज्वारी मालदांडी 2 हजार 990 रुपये,  बाजरी रू.२ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.


 तरी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरती हमीभावाने मका, ज्वारी व बाजरी विक्री करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी १५ ऑक्टोबर अखेर आपल्या मका, ज्वारी व बाजरी या शेतीमालाची ऑनलाईन नांव नोंदणी पंढरपूर तालुका सह. खरेदी विक्री संघ येथे वर नमूद केलेल्या कागदपत्रासह करावी, ऑनलाईन नांव नोंदणी शिवाय शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरती मका, ज्वारी व बाजरी विकी करता येणार नाही. तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी  याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, खरेदी विक्री संघाचे सभापती शांतीनाथ बागल यांनी केले आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!