धर्मनाथ पालखी सोहळ्यासोबत आले वानर
पंढरपूर : eagle eye news
पिंपळे ( ता. शिरूर जिल्हा पुणे ) येथून संत धर्मनाथ महाराज पालखी सोबत चक्क वानर आले असून हे वानर रथामध्ये, ट्रॅक्टर मध्ये चालकासोबत तर कधी रस्त्याने दिंडीतील वारकऱ्यांसोबत चालत असते. पालखी मार्गावर या वानराची हरिभक्ती चर्चेचा विषय ठरलेली आहे.
पिंपळे ( ता. शिरूर, जिल्हा पुणे ) येथून दरवर्षी धर्मनाथ महाराज यांचा पालखी सोहळा येत असतो. पालखी सोहळ्यासोबत सुमारे २०० भाविक आहेत. यावर्षी या पालकाही सोबत चक्क एक वानर आलेले आहे.
हे वानर दिवस रात्र पालखी सोबत असते. कधी तर रथात पालखी जवळ बसते, कधी रथावर असते तर कधी चालका सोबत ट्रॅक्टरमध्ये बसलेले असते. अधून मधून दिंडीतील वारकऱ्यांसोबत ते मार्गावर हि चालते. विशेष म्हणजे या माकडाचा कसलाच उपद्रव नसल्याने पालखी सोहळ्यातील भाविकांना हि त्याचा लळा लागलेला आहे.