खा. नवनीत राणा यांनाही कोरोनाची बाधा !

टीम : ईगल आय मीडिया

अमरावतीच्या अपक्ष खा. नवनीत कौर राणा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, त्यांचा रॅपिड अँटीजन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा वृत्ताला आ. रवी राणा यांचे बंधू सुनील राणा यांनी पुष्टी दिली आहे. तसेच स्वतः खा.राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

खा नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 7 जणांना 4 दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र त्यांचे पती आम. रवी राणा यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे राणा कुटुंबाला दिलासा मिळाला असला तरी 7 सदस्य बाधित झाले असू असून आ राणांचे वयोवृद्ध वडीलही बाधित असल्याने कुटुंब काळजीत आहे.
खा. नवनीत राणा यांचे सासरे, सासूबाई, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसंच त्यांचे पती आणि वडनेरचे आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे.

त्यांच्यानंतर आता खा. नवनीत राणा यांनाही कोरोना झाल्याने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या वृत्ताला प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा दिला नसला तरी युवा स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र वृत्ताला पुष्टी दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!