भंडीशेगाव येथील पूरग्रस्त भागाची खा.रणजितसिंह निंबाळकर यांनी केली पाहणी

भाजप कडून पुरग्रस्तांना मदत

पंढरपूर : ईगल आय मीडिया
भंडीशेगांव ( ता.पंढरपूर ) येथील कासाळ ओढ्याला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी खासदार रणजितसिंह निबळकर आले होते. यावेळी पंढरपूर चे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले उपस्थित होते.


सांगोला आणि पंढरपूर या दोन तालुक्यातील कासाळ ओढ्याला पूर आल्यामुळे ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने डाळिंबाच्या बागांचे तसेच ऊस पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच ओढ्याकाठाच्या शेती मधील माती धुवून गेली असून शेतकऱ्यांचे मोट्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


ओढ्याकाठाच्या शेतकऱ्यांचे घराचे नुकसान तसेच पशुधनाचे मोट्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.अनेक शेतकऱ्यांची शेती अवजारे, ओढ्यावर असणाऱ्या मोटारी व पाईप लाइन चे देखील नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमी या ओढ्या काठीच असतात, या सर्वधर्मीय स्मशानभूमीत पाणी आल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. मुस्लिम समाजाची दफन भूमी चे संपूर्ण कंपाउंड पाण्याने वाहून गेले आहे.
शेतकऱ्यांच्या सर्व मालमत्तेचे पंचनामे त्वरित करून सर्व बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेल याची खबरदारी घ्यावी असे यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.


भारतीय जनता पक्षाच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात गरजू आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यावेळी भाजपा चे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी पंचायत समिती सदस्य पल्लवी कंडरे,सरपंच हौसाबाई घाडगे,माजी उपसरपंच संतोष ननवरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गंगाराम विभूते,पांडुरंग कारखान्याचे संचालक बाळासाहेब येलमार,माजी सरपंच मधुकर गिड्डे,संजय रणखांबे,ऍड.दाजी येलमार,मंडल अधिकारी दीपक शिंदे,तलाठी श्रीकांत कदम,पोलीस कॉन्स्टेबल रमेश जाधव,ग्रामसेवक जी.बी.नरसाळे,डॉ.अनिल कंडरे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नवनाथ माने,डॉ.श्रीधर येलमार,दत्ता येलमार,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गिड्डे,सतीश रणखांबे,विजय उलभगत,व बाधित शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!