खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांची जलशक्ती मंत्र्यांकडे मागणी
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय जलशक्ती मंत्रालय येथे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन नीरा – देवघर लाभक्षेत्रातील प्रलंबित कामाविषयी दीर्घ चर्चा केली. तसेच या प्रकल्पाच्या प्रलंबित कामासाठी निधी देण्याची हि मागणी केली. आज ( दि.5 ऑगस्ट ) दिल्ली येथील जलशक्ती मंत्रालयात खा.निंबालकर यानी मंत्री शेखावत यांची भेट घेतली.
यावेळी 1984 ला मिळालेल्या मंजुरी पासून 2007 साली धरण बांधकाम पूर्ण होऊन लाभक्षेत्रातील प्रलंबित कामे किती अपुर्ण राहिलीत, राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे सीडब्ल्यूसी ची मान्यता मिळवण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. या लाभ क्षेत्रामुळे फलटण , माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये जनतेला यांचा फायदा होणार यामुळे हाजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे याबाबत आपण जातीने लक्ष देऊन यासाठी निधी उपलब्ध करुन दयावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेखावत यांच्याकडे केली.
या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत यापूर्वी चर्चा झाली आहे. पंतप्रधान ही याबाबत सकारात्मक आहेत, त्यामुळे जलसंपदा मंत्री शेखावत हे लवकरात लवकर लाभक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.