शिष्याला निरोप देण्यासाठी वस्ताद येणार

आ.भारत भालके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी येताहेत खा.शरद पवार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आपला लाडका पठ्ठा इहलोकीचा अखेरचा निरोप घेत असताना त्यास निरोप देण्यासाठी राजकीय वस्ताद खा. शरद पवार येत आहेत. आज सकाळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आ. भारत भालके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खा.शरद पवार सरकोली येथे येणार आहेत.

आ.भालके यांचे दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर दुपारी 4 वाजता सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या अंत्य दर्शनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीम हुन हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे शासकीय रोपवाटिका येथे येणार आहेत. तेथून मोटारीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहेत .

आ.भालके यांचे पार्थिव शरीर आज ( दि. 28 ) रोजी सकाळी 7.35 वाजता पुणे येथून मार्गस्थ झालेले आहे. सकाळी 10.30 वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे काही वेळ कारखान्याच्या कामगारांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंढरपूर येथे पोहोचेल. दुपारी सरकोली येथे पोहोचल्यानंतर दुपारी 1.30 ते 3.45 या वेळेत त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी सर्वांसाठी ठेवण्यात येईल. दुपारी 4.00 वाजता त्यांच्यावरती सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्य दर्शनासाठी खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत, खा.पवार यांनी पुण्यात हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या तब्येतीची विचारपूस ही केली होती. सोलापूर जिल्ह्यात भालके हे पवारांचे शिष्य मानले जातात. भालके यांच्या निधनाने खुद्द पवारांना ही मोठा धक्का बसला असून आपल्या शिष्याला अखेरचा निरोप देण्यासाठी खा.पवार येणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!