खा. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सात जण कोरोना बाधीत

आ. राणा पती-पत्नी मात्र निगेटिव्ह

टीम : ईगल आय मीडिया

अमरावतीच्या अपक्ष खा. नवनीत कौर राणा यांच्या कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र खा राणा, त्यांचे पती आम रवी राणा यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे राणा कुटुंबाला दिलासा मिळाला असला तरी 7 सदस्य बाधित झाले असू असून आ राणांचे वयोवृद्ध वडीलही बाधित असल्याने कुटुंब काळजीत आहे.
खा राणा यांचे सासरे, सासूबाई, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसंच त्यांचे पती आणि वडनेरचे आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे.


सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. तर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणीही चिंता कारायची गरज नाही. संयमाने स्वतःची काळजी घेऊनच आपल्याला करोनावर मात करायची असल्याचे ते म्हणाले. माझे आई- वडील आज ७०-७२ वर्षांचे आहेत. वृद्ध मंडळींची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. करोनाविरुद्धचा लढा आपण नक्कीच जिंकू असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!