आ देखे जरा, किसमे कितना है दम : ट्विटरवर दिले आव्हान !
टीम : ईगल आय मीडिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी ने नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशी करिता बोलावलं आहे. यावर खा. राऊत यांनी ईडीला चॅलेंज करणारं ट्विट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर या ट्विटची चर्चा सुरू आहे.
संजय राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना थेट ईडीला चॅलेंज केले आहे. ” आ देखे किसमे कितना है दम ” असे ट्विट राऊत यांनी केले आहे. या ट्विटरवर अनेक लोकांनी रिट्विट केले आहे. तसेच सोशल मीडियावर हे ट्विट चर्चेत आले आहे.
खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या पी एम सी बँकेच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असताना सौ वर्षा राऊत यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. त्या आधारे ईडी ने सौ. राऊत यांना आज नोटीस पाठवून 29 डिसेंम्बर रोजी चौकशीसाठी पाचारण केले आहे.
या नोटीसी नंतर राज्यातील राजकीत वातावरण अधिक तापले आहे. भाजप चे खासदार किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला भरावा अशी मागणी केली आहे.