आणि खा.पवारांनी वधूवरास आशीर्वाद दिले

हात केला आणि नवविवाहित जोडप्यासाठी पवारांचा ताफा थांबला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

खा. शरद पवारांचा ताफा पंढरपूर – सरकोली मार्गावरून वेगाने निघाला होता. रस्त्याच्या कडेला नवविवाहित वधू वर उभा होते, त्यानी पवारांना हात केला आणि चक्क पवारांच्या वाहनांचा ताफा उभा राहिला, गाडीतूनच पवारांनी विवाहित वधू वरांस आशीर्वाद दिले.

देव भेटला !

देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालेल्या नव विवाहित सूरज शिंदे यांना राजकारणातील लाखो युवकांचे दैवत असलेल्या खा. शरद पवारांनी आशीर्वाद दिल्याने सूरज शिंदे यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आज साक्षात देव भेटला अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गादेगाव ( ता.पंढरपूर ) येथील सूरज नवनाथ शिंदे आणि सौ. काजल सूरज शिंदे या जोडप्याचा 17नोव्हेंबर रोजी विवाह झाला होता. त्यांनतर शुक्रवारी ( दि. 18 रोजी ) आंबे ( ता. पंढरपूर ) येथील कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी हे नवविवाहित जोडपे निघाले होते. रांझनी ( ता. पंढरपूर ) येथील चौकात आले असता समोरून सरकोली येथील भालके कुटुंबियांचे सांत्वन करून खा. शरद पवार पंढरपूर कडे निघाले होते.

त्यांच्या वाहनांचा ताफा जवळ आला असता जोडप्याने त्याना हात केला आणि चक्क ताफा थांबला. अचानक पवारांचा ताफा थांबल्याने सर्व जण अचंबित झाले. लगेचच विवाहित जोडपे पवारांच्या गाडीजवळ पोहोचले आणि त्यांनी पवारांचे आशीर्वाद घेतले. गाडीतूनच हात काढून पवारांनी नव विवाहिताना आशीर्वाद दिले आणि त्यांचा वाहनांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. एवढ्या मोठ्या नेत्याने सामान्य कुटुंबातील नव विवाहित जोडप्यास रस्त्यावर थांबून आशीर्वाद दिल्याने पंढरपूर तालुक्यात कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!