एकेका मित्राच्या निधनाने खा. शरद पवारांनी व्यक्त केली खंत
टीम : ईगल आय मीडिया
मागील आठवड्यात निश्चित केलेली भेट झाली नाही आणि जिवाभावाचा मित्र सोडून गेला. या दुःखात असलेल्या खा. शरद पवार याना एकेका मित्रांच्या दुरावण्याचे दुःख लपवता आले नाही, आणि आमच्या वेळचं आता कोण कोण राहिलं आहे ? रघु दादा, बी जी, के.वाय. आता आपण एवढेच राहिलो, असे हताश उद्गार काढले. त्यांच्या या विचारणे नंतर सगळेच उपस्थित सद्गगदीत झाले.
आमच्या वेळचं कोण कोण राहिलं आहे अशी विचारणा केली. त्यावेळी बारामती च्या पश्चिम भागातील काही मोजकेच सहकारी हयात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पवारांनी हताश होऊन, ‘ राघूदादा, बी. जी, के.वाय. एवढेच राहिले सोबत ‘, अशी खंत व्यक्त केली आणि भोसले कुटुंबाचा निरोप घेतला.
वानेवाडी ( ता. बारामती ) येथील खा. पवारांचे जेष्ठ सहकारी आणि पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. तत्पूर्वी भोसले यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे शिवाजीराव भोसले यांना पवारांची मागील आठवड्यात भेटायचे ठरवले होते, मात्र भोसले आजारी पडल्याने त्यांची भेट राहून गेली.
अखेरीस उपचारा दरम्यान शिवाजीराव भोसले यांचेही 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. आज दुसऱ्याच दिवशी खा. पवार भोसले कुटुंबियांच्या भेटीसाठी सपत्नीक प्रतिभा ताई पवार यांच्यासह गेले. त्यावेळी त्यांनी राहून गेलेल्या भेटीबद्दल खंत व्यक्त केली.