असा असेल खा.पवारांचा सरकोली दौरा


पंढरपूर : ईगल आय मीडिया


राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा आज सरकोली दौरा असून सकाळी 10 वाजता ते सरकोली येथे येत आहेत.
28 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी चे आम.भारत भालके यांचे निधन झाले. त्यामुळे भालके कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार आज ( 18 ) आ.भालके यांच्या गावी सरकोली येथे येणार आहेत.

बारामती येथून हेलिकॉप्टर ने सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार आहे. तिथून मोटारीने ते सरकोली कडे जाणार आहेत. सकाळी 10 वाजता सरकोली येथे त्यांचे आगमन होणार असून 10 ते साडे दहा वाजे पर्यंत ते आ.भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर परत मोटारीने पंढरपूर ला येऊन हेलिकॉप्टर ने बारामतीला प्रयाण ठेवतील.

खा.पवारांच्या या सांत्वन दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा निवडणुक, 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन निवड तसेच आगामी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक या अनुषंगाने खा. पवार काही सूचना,मार्गदर्शन करतील. पुढची दिशा निश्चित करून जातील असे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!