अखेर खा. स्वामी पुरग्रस्तांच्या भेटीला

ईगल आय मीडियाच्या वृत्तानंतर आली जाग ?

पंढरपूर : ईगल आय मीडिया

महापूर ओसरून, अतिवृष्टी होऊन सुमारे 10 दिवस उलटून गेल्यानंतर सोलापूरचे खा जयसिद्धेश्वर स्वामी शनिवारी मंगळवेढा तालुक्यातील बाधित गावात येत आहेत. शुक्रवारी च the eagle eye media संकेतस्थळावर याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर खा स्वामी शनिवारी दौरा काढला असल्याचे बोलले जात आहे.

दुपारी १ वाजता ब्रह्मपुरी , २ वाजता बठाण , ३ वाजता उचेठाण व ४ वाजता तामदर्डी या भागात दौरा होत असून पुरामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नागरिकांचे नुकसान झाले त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून त्या सोडवण्यासाठी ते येत आहेत.

सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा आज मंगळवेढा तालुक्यातील पूरग्रस्त भागांमध्ये दौरा होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली.

या दौऱ्यामध्ये तहसीलदार व सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत या भागातील नागरिकांच्या अडचणी असतील तर प्रत्यक्ष भेटून त्या मांडाव्यात असे आवाहन शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!