तिरुपतीचे खासदार बल्ली दुर्गाप्रद राव यांचे निधन
टीम : ईगल आय मीडिया
तिरुपतीचे ysr काँग्रेसचे खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव यांचे बुधवारी सायंकाळी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. १५ दिवसांपूर्वी त्यांना कोरोना निदान झाला होता आणि चांगल्या उपचारासाठी चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून, लोकसभा खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव गारू यांच्या निधनामुळे दु: खी झालो. ते एक अनुभवी नेते होते. आंध्र प्रदेशाच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिलं. त्यांचे हितचिंतक आणि कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असं म्हटल आहे आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही शोक व्यक्त करताना तिरुपतीचे लोकसभा खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव यांच्या अकाली निधनाने दु: ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव हे मूळचे नेल्लोरचे रहिवासी होते. गुडूर जिल्ह्यातून ते चार वेळा आमदार झाले होते. बल्ली दुर्गा यांनी शालेय शिक्षणमंत्री म्हणून तसेच लोकलेखा समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. गेल्या वर्षी त्यांनी वायएसआर कॉंग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तिरुपती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
काँग्रेसचे खासदार वसंतकुमार यांचे ऑगस्टमध्ये झाले होते निधन
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत सात केंद्रीय मंत्री आणि दोन्ही सभागृहांतील मिळून 30 खासदार आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लागण झालेली आढळली आहेत. यापूर्वी लोकसभेचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचेही 29 ऑगस्ट रोजी करोनाने निधन झाले. याशिवाय देशातील अनेक आमदारांचाही करोनाने बळी घेतला आहे.