Mpsc परीक्षेत दिनेश खरातचे यश

मंत्रालय लेखनिक पदी निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मंत्रालय क्लार्कपदी n t c प्रवर्गातून पुळूज ( ता. पंढरपूर ) येथील दिनेश मोहन खरात यांची प्रथम क्रमांकाने निवड झाली. Mpsc परीक्षेत आंबे येथील रोहिणी गायगोपाल हिने नायब तहसीलदार पदाची पोस्ट पटकावली आहे. या परीक्षेत तालुक्यातील हे दुसरे यश आहे.

संबंधित बातमी वाचा !

दिनेश खरात हे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे शिक्षण पुळुज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे व माध्यमिक शिक्षण सुधाकरपंत परिचारक विद्यालय शारदानगर व पदवी शिक्षण पंढरपूर येथील शेळवे येथे पूर्ण केले.

या यशाबद्दल पुळुज गावातून त्याचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दत्तात्रय पांढरे, सरपंच शिवाजी शेंडगे, रतिलाल आप्पा गावडे, युवराज शिंदे, किसन जाधव, भगवान बाबर, बापू शिंदे, जाकिर मुलानी, जावेद शेख, तलाठी गायकवाड भाऊसाहेब, ग्रामसेवक प्रक्षाळे भाऊसाहेब, स्मारक समिती अध्यक्ष लिंगदेव निळगुंडे, पैलवान ग्रुप तालुका अध्यक्ष नवनाथ आप्पा खरात, अण्णासाहेब शेंडगे, पैलवान महादेव शेंडगे, महादेव शिंदे, पंकज गावडे, संजय ममाने, शिवाजी सलगर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!