21 मार्च : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची नवीन तारीख

सरकार आणि लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांपुढे नमले

टीम : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 21 मार्च रोजी होणार आहे.यासंदर्भात आज राज्य लोकसेवा आयोगाने पत्र काढले आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर 14 मार्च रोजी होणाऱ्या या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर केले होते.त्यानंतर राज्यभरातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

सर्व स्तरातून मोठा विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्यात येतील आणि नवीन तारीख जाहीर केली जाईल असे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज राज्य लोकसेवा आयोगाने रविवारी, 21 मार्च रोजी परीक्षा घेण्यात येत तील असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० शनिवारी २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेतच घेतल्या जातील, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

त्याच बरोबर 14 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रावर 21 रोजी च्या परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल. 27 मार्च रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, 11 एप्रिल रोजी होणाऱ्या दुय्यम राजपत्रित गट सेवा संयुक्त परीक्षा नियोजित तारखांना होतील त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असेही राज्य लोकसेवा आयोगाने कळवले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या या नवीन निर्णयाचे विद्यार्थ्यांतून स्वागत होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!