राज्यातील १० अधिकारी निलंबीत : ४ हजार ७० कोटी थकबाकी
पंढरपूर : टीम ईगल आय न्यूज
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंढरपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांना वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसुली केली नाही म्हणून निलंबित करण्यात आले आहे. थकबाकी वसुलसाठी थेट कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आल्याने वीज वितरण विभागात खळबळ उडाली आहे. या बाबत महावितरण चे संचालक संजय ताकसांडे यांनी यांनी १४ फेब्रुवारी निलंबनाचा आदेश काढला आहे. पंढरपूर विभागीय कार्यकारी अभियंता संजय गवळी यांच्यपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील उध्दव गोरख जाधव, उपकार्यकारी अभियंता उपविभाग टेंभुर्णी आणि आनंद शिवाजी गाडेकर सहाय्यक अभियंता बार्शी बि झोन शाखा कार्यालय या अधिकाऱ्यांना ही थकबाकी वसुली आणि इतर कारणाने निलंबित करण्यात आले आहे.
संजय गवळी हे पंढरपूर विभागीय कार्यालय येथे कार्यकारी अधिकारि या पदावर दि. ०३ सप्टेंबर २०१९ पासून कार्यरत आहेत. महावितरणच्या एकूण थकबाकीबाबत आढावा घेण्यात आला असता कायम स्वरुपी खंडीत केलेल्या ग्राहकांची थकबाकी ४०७० कोटी (रु.) इतकी वाढलेली असल्याचे दिसून आले. तसेच मागील २ वर्षांमध्ये राज्यातील एकूण १०.३० लाख ग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडीत केला असून त्यांचेकडे एकूण १३५७ कोटी रुपयाची थकबाकी असल्याचेही निदर्शनास आले.
निलंबित करण्यात आलेलेअधिकारी
१)मनिष बापुराव ठाकरे – का.अभियंता- राजगुरू नगर विभाग, २) संजय रामचंद्र गवळी -का.अभियंता- पंढरपूर विभाग, ३) रत्नदिप गंगाराम तायडेका.अभियंता वाशिम विभाग, ४) हिरालाल ज्ञानेश्वर जांभुळकर उपकार्यकारी अभियंता मंगरूळपिर उपविभाग,५) प्रकाश नाथा काकडेसहाय्यक अभियंता यवतशाखा कार्यालय, ६)उध्दव गोरख जाधवउपकार्यकारी अभियंताउपविभाग टेंभुर्णी, ७) आनंद शिवाजी गाडेकरसहाय्यक अभियंताबार्शी बिझोन शाखा कार्यालय
पंढरपूर विभागातील कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांची चालू फेब्रुवारी महिन्यात तपासनी केली असता ‘कायमस्वरुपी खंडीत’ असणाऱ्या एकूण ६२ ग्राहकांकडे प्रत्यक्ष जागेवर मिटरद्वारे किंवा दुसऱ्या ग्राहक क्रमांकाद्वारे वीज जोडणी दिली असल्याचे आढळून आले. ही बाब अतिशय गंभीर मानून विभाग प्रमुख या नात्याने संजय गवळी यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्यावर चौकशी सुरु असताना सेवेतून निलंबनची कारवाई केली आहे.
चालू बिनशेती ग्राहकांची थकबाकी २९८ कोटी तर कृषी ग्राहकांची थकबाकी तब्बल १८९२ कोटी इतकी आहे. तसेच कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत असणा-या ग्राहकांकडील थकबाकी ४३ कोटी इतकी आहे. यावरुन गवळी हे त्यांच्या हाताखालील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आणि थकबाकीदार ग्राहकांची वसुली न केल्याने महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या संदर्भात सखोल चौकशी करताना तपास कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये याकरीता निलंबित करण्यात आले आहे. संचालक (संचलन) तथा सक्षम अधिकारी म्हणून संजय ताकसांडे यांनी गवळी यांना १४ फेब्रुवारी पासून पुढील आदेशापर्यंत कंपनीच्या सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाई मुळे वीज वितरण विभागात खळबळ उडाली आहे.