गौतम अडाणी यांची दुसऱ्या स्थानी झेप
शिव नादर सायरस पुनावाला लक्ष्मी मित्तल उदय कोटक राधाकिशन दमानी पालनजी मिस्त्री
टीम : ईगल आय मीडिया
भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने 2020 ची सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं नवीन आहेत. एकेकाळी देशातील सर्वधिक श्रीमंत असणारे अझीम प्रेमजी पहिल्या 10 जणांच्या यादी बाहेर गेले आहेत. सलग 13 व्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आपले अव्वल स्थान राखले आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी हे सलग १३ वर्षे भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मुकेश अंबानींकडे ८८.७ अब्ज डॉलर संपत्ती आहे. लॉक डाउन च्या काळातही रिलायन्सची वाढ होत असून रिलायन्स समुहाच्या अंबानी यांच्यानंतर सर्वाधिक श्रीमंत लोक खालील प्रमाणे आहेत.
2 ) भारतातील श्रीमंतांच्या यादीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र मानले जाणारे अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी : त्यांची संपत्ती २५.२ अब्ज डॉलर आहे.
3) एचसीएल टेक्नॉलॉजिजचे शीव नाडर : संपत्ती २०.४ अब्ज डॉलर.
4) डी मार्टचे राधाकिशन दमानी : संपत्ती १५.४ अब्ज डॉलर.
5) हिंदुजा ब्रदर्स : संपत्ती १२.८ अब्ज डॉलर.
6 ) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पूनावाला. संपत्ती ११.५ अब्ज डॉलर.
7 ) पालोनजी मिस्त्री : संपत्ती ११.४ अब्ज डॉलर.
8 ) कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक : संपत्ती ११.३ अब्ज डॉलर.
9) गोदरेज कुटुंब : संपत्ती ११ अब्ज डॉलर.
10 ) आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल : १०.३ अब्ज डॉलर.
सर्वाधिक १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत केवळ तीन महिला आहेत. यामध्ये ओपी जिंदाल समुहाच्या सावित्री जिंदाल या १९व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ६.६ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर बायोकॉनच्या किरण मुजूमदार शॉ या २७व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ४.६ अब्ज डॉलर आहे. तर युएसव्हीच्या लीना तिवारी या तीन अब्ज डॉलर संपत्तीसह ४७व्या स्थानी आहेत.