मुंबई पोलिसांची माफी मागा : आ. रोहित पवार

सुशांतसिंग ची आत्महत्याच : एम्सचा अहवाल

टीम : ईगल आय मीडिया

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्स ने दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी चे युवा आमदार रोहित पवार यांनी तर मुंब5 पोलिसांची बदनामी करणाऱ्यानी आता तोंड न लपवता मुंबई पोलिसांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

“बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून विरोधकांवर निशाणा साधला. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच पोलिसांनी बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!