मुंबईत भिंत कोसळून 14 जण ठार

मृतांची संख्या वाढण्याची भीती

टीम : ईगल आय मीडिया

मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याने मृतांचा आकडा शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना भारत नगरमध्ये घडली आहे. यामुळे त्या परिसरातील चार ते पाच परिसरात घरांवर भिंत कोसळली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. मुंबईत मुसळधार पावसात दोन ठिकाणी दरड कोसळली. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईत दुर्घटना, सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना फटका बसला आहे.

सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अद्याप 6 ते 8 जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सध्या या ठिकाणी वेगाने बचावकार्य सुरु आहे. मुंबईत रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या पाच ते सहा तास तुफान पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता.

Leave a Reply

error: Content is protected !!