
टीम : ईगल आय मीडिया
मुंब्रा कौसा भागात प्राईम क्रीटीकेयर हॉस्पिटमध्ये आज पहाटे 3 वाजता लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आग लागली तेव्हा 17 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते, त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, मुंब्रा कळवा चे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतांच्या वारसांना स्वतःच्या वतीने प्रत्येकी 1 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रत्येकी 5 लाख रुपयांची घोषणा केली आहे.
यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या सुरू असून यात आणखी काही लोकांची जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.