वाखरीत महिलेचा खून

मानेवर, डोक्यावर धारदार शस्त्राने केले वार

पंढरपूर : ईगल आय न्यूज

वाखरी ( तालुका पंढरपूर ) येथील एका वृद्ध महिलेचा अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे वाखरी परिसरात खळबळ उडाली असून मालन किसन ढाळे ( वय ६५ वर्षे ) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, वाखरी येथील गोसावी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये श्रीमती मालन किसन ढाळे यांचा मृतदेह बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दिसून आला. मालन ढाळे या सकाळीं फिरायला म्हणून गेल्या त्या परत आल्या नाहीत, असे सांगितले जाते. दुपारी या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील बाळासाहेब शेंडे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यास या खूनाची माहिती दिली.

त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भुजबळ यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. श्रीमती मालन ढाळे यांच्या मानेवर, डोक्यावर व डोळ्याच्या बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत आहे. त्यांचा खून कोणी केला, व कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी पंचनामा केलेला आहे. व पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे नोकरी परिसरात उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!