सायकल घेऊन नागरिकांनी रॅलीसाठी येऊ नये : मुख्याधिकारी मनोरकर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने रविवारी आयोजित केलेली ‘ माझं कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेअंतर्गत भव्य सायकल रॅली शनिवारी रात्री उशिरा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही उद्या सायकल घेऊन रॅलीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊ नये असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी केले आहे.
पंढरपूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेनुसार भव्य सायकल रॅली आयोजित केली होती. याकरिता पंढरपूरकराना रॅलीत सहभागी होण्याचेआवाहनही केले होते. रविवारी सकाळी साडे सहा वाजता ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकतून सुरू होणार होती.
मात्र कोरोना च्या काळात सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे, गर्दी जमवून या बेजबाबदार रॅलीतून काय साध्य होणार आहे असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात होता.
दरम्यान, सायंकाळी यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही रॅली रद्द करण्यात आली असल्याचे, मुख्याधिकारी मनोरकर यांनी कळविले आहे. तसेच रॅली साठी कुणीही नागरिकांनी सायकली घेऊ येऊ नये असेही आवाहन केले आहे.