के पी एस मल्होत्रा
टीम : ईगल आय मीडिया
अभिनेत्री दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर, सारा अलिखान, रकुल प्रीत सिंग यांची अनेक तास चौकशी करणारे एन सी बी अधिकारी शनिवारी कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना करोनाची लागण झाली आहे, करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला गेले आहेत.
ड्रग्स कनेक्शनचा तपास करताना बॉलिवूडमधील अनेक नावे समोर आली. एनसीबीच्या टीमने नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर, सारा अलिखान सह आणि इतर अभिनेत्रींची चौकशी केली होती.
एनसीबीच्या या टीमचे केपीएस मल्होत्रा नेतृत्व करत आहे. शनिवारी रात्री केपीएस मल्होत्रा यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.