पंढरपूर : ईगल आय न्यूज
नांदोरे ( तालुका पंढरपूर ) येथील
पायल फाउंडेशन, संचलित एस.पी. पब्लिक स्कूल या प्रशालेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100% लागला. या परीक्षेसाठी प्रशालोमधील एकूण 33 विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्वच म्हणजे 33 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये पात्र झाले. विशेष म्हणजे ९० टक्के हून अधिक गुण मिळवलेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रशालेचे ही पालकांतून अभिनंदन होत आहे.
यामध्ये शितल शिवाजी मोरे हिने 92 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, ऋतुजा सुहास यादव हिने 91 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, अमरजा हणुमंत ननवरे व रोहन सत्यवान पवार यांनी 90.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक तर तृप्ती दादासो पाटील हिने 90 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक डॉ. नंदकुमार होनराव, संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शहाजी साठे, अमरनाथ इंगोले, साईनाथ कुंभार ,सुरज अलगुडे ,कुणाल निंबाळकर या शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्रशालेचे सर्वत्र कौतुक होत आहे.