नारायण मोरे यांचे कोरोनामुळे निधन

विठ्ठल परिवाराने आणखी एक नेता गमावला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नारायण मोरे यांचे आज दुपारी सोलापूर येथे निधन झाले. याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोना झाल्याचे तपासणी नंतर उघड झाले होते. त्यातच उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराने आणखी एक जेष्ठ नेता कोरोना मुळे गमावला आहे. गेल्या 15 वर्षांपासून नारायण मोरे हे यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने यशस्वी वाटचाल कायम ठेवली होती.

या महिन्याच्या सुरुवातीला त्यांचे चालक गणेश शिरगिरे यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नारायण मोरे यांना तसेच पतसंस्थेतील 3 कर्मचाऱ्यांना ही कोरोना लागण झाली होती. ते कर्मचारी नीट झाले मात्र मोरे यांचा चालक गणेश शिरगिरे यांचे मागील आठवड्यात निधन झाले.

नारायण मोरे यांची ही प्रकृती खालावत गेल्याने त्यांच्यावर पंढरपूर, सोलापूर येथील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. अखेरीस सोलापूर येथे उपचार सुरू असताना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

नारायण मोरे यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराने दिवंगत आ भारत भालके, राजूबापू पाटील यांच्या पाठोपाठ आणखी एक नेता कोरोनामुळे गमावला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!