असा झाला नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम

राणे यांच्या अटकेमागील घडामोडी समोर

टीम : ईगल आय मीडिया

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा करेक्ट कार्यक्रम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नियोजन पूर्वक केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संमती नंतर राणेंच्या अटकेचा कार्यक्रम केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी कमी होत नाहीत, 2 सप्टेंबर पर्यंत हजर राहण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी बजावली आहे.

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटकेचा निर्णय राबवणे सोपी गोष्ट नव्हती. याबाबत कुणी कल्पनाही केली नसेल. मात्र 23 ऑगस्ट रोजी राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवून हा कार्यक्रम राबवला असल्याचे दिसते. राणे यांच्या अटक आणि जामीनानंतर पडद्यामागच्या घडामोडी समोर येत आहेत.

नारायण राणेंच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या संपर्कात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता त्याआधीचा निर्णय म्हणजे राणेंच्या अटकेच्या कारवाईला हिरवा झेंडा कोणी दाखवला, याबाबतची माहिती समोर आली आहे.


नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारी रात्रीच फोनाफोनी झाली होती, अशी माहिती समोर येेेत आहे.यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी नारायण राणेंवर कारवाई करण्यावर जोर दिला होता. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा नारायण राणेंच्या अटकेबाबत निर्णय झाला.

त्यानुसार मंगळवारी 24 ऑगस्टला नारायण राणेंवर अटकेची कारवाई झाली. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम संमती नंतरच राणेंवर अटकेची कारवाई करण्याचा निर्णय झाला, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांना कारवाईसाठी मोकळीक देण्याचा निर्णय झाला आणि दुसऱ्याच दिवशी नारायण राणेंना अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं.
 

 दरम्यान, नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली असून त्यात राणेंना 2 सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाशिकमध्ये राणेंविरोधातील पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या विनंतीनंतर रत्नागिरी पोलिसांनी  नारायण राणे यांना मंगळवारी (24 ऑगस्ट) अटक केली.

तर नारायण राणे यांना रात्री उशिरा महाड कार्टाकडून अटी शर्तींसह जामीन मिळाला.  जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!