लवकरच अंदाजपत्रक होणार : पाणी प्रश्न मार्गी लावण्याची राजाभाऊ खरे यांची ग्वाही
पंढरपूर : eagle eye news
शिरापूर उपसा सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या नारोटेवाडी सह इतर गावच्या पाणी प्रश्नावर गुरुवारी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कालवा मार्गाची पाहणी केली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे. यामुळे नारोटेवाडीसह नान्नज भागातील शेतकऱ्यांच्या पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून कालव्या अभावी नान्नज,नरोटेवाडी या भागातील शेतीला पाणी मिळत नाही. केवळ या दोन किमी लांबीचा कालवा खोदल्यास या भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शिवसेना नेते आणि उद्योजक राजाभाऊ खरे यांनी गावभेट दौरा आणि शेतकरी मेळाव्यासाठी आल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी खरे यांच्याकडे हा प्रश्न मांडून यातून मार्ग काढण्याची मागणी शेतकरी मेळाव्यात केली होती. राजाभाऊ खरे यांनी तात्काळ याबाबत पाठपुरावा सुरू केला असून गुरुवारी सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत कालवा भागाची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांकडून आठ दिवसात सर्व्हेक्षण अहवाल देण्याच्या सूचना
नारोटेवडीचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठबंधारे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर यांना लेखी आणि फोनद्वारे सूचना दिल्या आहेत.यानुसार पुणे येथील मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचेकडे या कामी सर्व जबाबदारी सोपवली आहे. येत्या आठ या कामासाठी मंजुरी मिळावी याबाबतचे सर्व्हे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळेच सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी यांनी राजू खरे यांच्या समक्ष भागाची पाहणी केली आहे.
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांनी वरील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले आहेत. यामुळे राजू खरे यांचे समवेत अधिकारी यांनी त्या भागाची पाहणी केली आहे. याबाबत लवकरच अंदाजपत्रक सादर करून कामास मंजुरी मिळवून या कामास सुरुवात करण्यात येईल असेही उपस्थित अधिकारी यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिले आहे.
यावेळी सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता डी .ए बागडे, कार्यकारी अभियंता दि. जे. कोंडेकर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्राम चाकोते, भीमाशंकर बिराजदार, विठ्ठल जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजकुमार शिंदे, शशिकांत शिंदे, विजय साठे,आकाश गजघाटे आदींसह उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी , नरोटेवाडी व आणि नान्नज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.