शिक्षक परिषदेच्या फेसबुक live चर्चा सत्रात शिक्षण तज्ज्ञ प्राची साठे यांचे मत
पंढरपूर : ईगल आय मीडिया
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 या फेसबुक लाईव्ह चर्चा सत्रात पहिले पुष्प गुंफताना शिक्षण तज्ज्ञ प्राची साठे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अनेक पैलू उलगडून दाखवले. यावेळी आमदार संजय केळकर ,राजाध्यक्ष राजेश सुर्वे उपस्थित होते.
पुढील दोनही व्याख्यानांचा लाभ घेण्याचे अवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघमारे यांनी केले आहे.पुरुषोत्तम काळे यांनी परिषद गीत सादर केले.
यावेळी बोलताना प्राची साठे यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रथमच अतीप्रगत विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच ,जन्मापासून 3 वर्षापर्यंतच्या बालकांच्या पालकांना मार्गदर्शक तत्वांचा सामावेश यामध्ये असल्याचे सांगितले . यातून देशाभिमानी,आत्मविश्वासपूर्ण,स्वज्ञानी,समन्वाय व समभाव असणारा भारतीय नागरीक निर्माण करण्याचेशा ध्यैय ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विषयाचे स्वातंत्र्या बरोबरच 10 दिवसांचे अनुभूतीयुक्त इंटरशिपही असणार आहे.प्रशासकीय दृष्ट्या कोणतेही बदल होणार नाहीत.याची बलस्थाने पाहता शिक्षकांनी हे धोरण समजावून घेऊन नवीन पाठ्यपुस्तक येण्याची वाट न पाहता 1ली/2रीसाठी अक्षर ओळख व अंकओळखव3री/4थीसाठीभाषा समृद्धीकरण व मुलभूत गणिती क्रीया यांचा आहे ह्या पाठ्यपुस्तकातून सहज अवलंब करण्याचे अवाहनही प्राची साठे यांनी केले. बोर्ड राहणारच असून बोर्डांना समानसुत्री नियम देणारी समिती राहणार आहे.शिक्षकांना प्रतिवर्षी 50 दिवसांचे प्रशिक्षण आवश्यकअसून टंलेंटवर भरती व पदोन्नती मिळणार आहे.तसेच जाॕबचार्ट निश्चित केल्याने शाळेत्तर कामे बंद होणार आहेत. यामध्ये त्रीभाषा सुत्रींचा अवलंब करण्यात आला असून त्यामध्ये दोन स्थानिक भाषांचा सामावेश आहे.सर्व इयत्तेसाठी विद्यार्थ्यांना एकच एकच प्रगतीपुस्तक असणार असून स्वतःसह ,सहध्यायी मित्र व शिक्षकांचे शेरे त्यामध्ये आसणार आहेत.अनेक शाळांचे एकत्रीकरण हे सोई सुविधांच्या समन्वयासाठीच होणार आहे. उत्तम आखणी असणार्या या धोरणात आशयाबरोबरच कौशल्याला महत्व असून माणूस घडविण्यावर भर आहे.तसेच नियमावलीत लवचिकता पण काटेखोर पालन व विविधतेस व स्थानिकतेस वाव असणारा हा अभ्यासक्रम आसणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी साठे यांनी मांडलेल्या काही ठळक बाबी
अभ्यासक्रम रचना विद्यार्थी केंद्रित ,अनुभवाधारित,सर्वसमावेशक,शोधकवृत्तीस,कुतूहलास चालना देणारा व कृतीयुक्त अभ्यासक्रम असणार आहे.
तत्वे
या धोरणांची तत्वे मुलभूत क्षमतांची विकास करणारी,आकलनास व प्रथमच उच्चत्तम आकलन क्षमतांचा विकास व भारतीय ज्ञानाचा दिपस्तंभ दर्शविणारी आहेत.
0 ते 3 वर्ष या वयोगटातील पालकांसाठी मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.
3 वर्ष ते 8 वर्षे
अंगणवाडीच्या तीन वर्षासाठी प्रथमच अभ्यासक्रमाचे नियोजन असून कृतीयुक्त,अनुभवाधिष्ठित गाणी,गप्पा,गोष्टी ,अक्षर व अंक ओळखीचा यामध्ये समावेश असून 1 ली वा 2री वर्गाचा अभ्यासक्रम यालाच जोडून असणार आहे. अंगणवाडी व सेवीकाताईंच्या प्रशिक्षणाबाबतही यामध्ये समावेश आहे
3री ते 5वी
या वर्गासाठी भाषाज्ञान समृद् व मुलभूत गणितीय क्रिया समृद्ध करण्यात येतील.
6वी ते 8 वी
यामध्ये प्रत्येक विषयांचा परिचय करुन देवून त्यांची रुची वाढविली जाणार आहे. व्यवसाय शिक्षणाची सुरवात इयत्ता सहावी पासून होणार आहे.
9वी ते 12वी
सर्व विषयांचा समन्वय साधला जाणार असून कला,क्रीडेसह सर्वच विषयांना समान महत्व असणार आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच 10 दिवसांचे इंटरशिप स्वअनुभवही मिळणार आहे.
आज लाईव्ह सेशन आहे का, कृपया सांगा