राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत सुनील उंबरे यांना ब्रांझ पदक


ठाणे महापौरांच्या उपस्थितीत पार पडला पुरस्कार सोहळा

पंढरपूर : ईगल आय मीडिया


फोटो सर्कल सोसायटी, मुंबई व ठाणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ठाणे महापौर राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत सुनील उंबरे यांच्या छायाचित्राला ब्रांझ पदक प्राप्त झाले असून ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते श्री व सौ उंबरे यांना मिडल आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.


ठाण्यातील हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर महापौर नरेश मस्के, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वळकी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष ऍड माधवी नाईक, नगरसेविका नम्रता फाटक, नगरसेविका मीनल संख्ये आदी उपस्थित होते.


ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफी या विभागात उंबरे यांच्या प्रवाशांनी भरगच्च भरलेली रेल्वे या छायाचित्राला नामांकन मिळाल्याने, ब्रांझ पदक आणि रोख रक्कम देऊन सुनील उंबरे व हेमा उंबरे यांचा सन्मान करण्यात आला.

गेल्या 22 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. देशपातळीवरील नावाजलेल्या या स्पर्धेत यावर्षी 300 हून अधिक स्पर्धकांच्या 3500 फोटोचा सहभाग होता. 3500 पैकी 300 निवडक फोटोंचे ठाकरे स्मारकामध्ये फोटो प्रदर्शन लावण्यात आले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!