अखेर नवाब मलिक यांना अटक

8 तास चौकशी केल्यानंतर ईडी ने अटक केली

टीम : ईगल आय मीडिया

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने त्यांना कार्यालयात नेऊन आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आल्याचे ए एन आय च्या वृत्तात म्हटले आहे. चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर येत मलिक यांनी झुकेंगे नही लढेंगे अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते.

ईडीने आतापर्यंत वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील मालमत्तेसह साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, ताडदेवमधील अरुण चेंबसमध्ये असलेले कार्यालय, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकाने, बंगले आणि लोणावळ्यातील 5 एकर पेक्षा अधिक जमीन अशा ईक्बाल मिर्चीच्या तब्बल 600 कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

मनी लॉड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!