तीन छाप्यात एकच पंच

नवाब मलिक यांनी ncb विरोधात आणखी एक खळबळजनक आरोप

टीम : ईगल आय मीडिया

एनसीबी ही तपास यंत्रणा भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून व मदतीनं कारवाया करते, स्वत:च बातम्या पेरून लोकांची बदनामी करते, असं सांगणाऱ्या मलिक यांनी एनसीबीवर आज आणखी एक आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर हँडलवर काही फोटो आणि तीन पंचनामे शेअर केले आहेत. हे फोटो फ्लेचर पटेल नामक एका इसमाचे आहेत.

कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो नं केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप करत खळबळ उडवून देणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांनी एनसीबीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

मुंबईत साजरा करण्यात आलेल्या कारगील शहीद दिवसाच्या कार्यक्रमातील हे फोटो आहेत. यात फ्लेचर पटेल हा व्यक्ती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत दिसत आहे. सन्मानचिन्ह देऊन वानखेडे यांचं स्वागत करताना दिसत आहे. हाच फ्लेचर पटेल एनसीबीनं तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांच्या प्रकरणात पंच आहे.

फ्लेचर पटेल हा कोण आहे? एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी त्याचा काय संबंध आहे? एनसीबीच्या छाप्यांच्या वेळी तो नेमका तिथं कसा उपस्थित असतो? असे अनेक प्रश्न मलिक यांनी या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

संबंधित पंचनाम्याच्या प्रती सुद्धा माहितीसाठी मलिक यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकच व्यक्ती पंच कसा असू शकतो, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!