राणेंच्या वक्तव्यास भाजपचा पाठिंबा आहे काय ?

राष्ट्रवादी चा पंतप्रधान मोदींसह फडणवीस, चंद्रकांत पाटलांना सवाल

टीम : ईगल आय मीडिया

 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. अशी भाषा महाराष्ट्रात अशी भाषा कधीच कुणी वापरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले? राणेंच्या या वक्तव्याला तुमचं समर्थन करत आहात काय?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपलाही काही सवाल केले आहेत.

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच वक्तव्य निषेधार्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीची आहे. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय, महाराष्ट्रात शिवसेनेनं जबाबदारीनं वागण्याचं काम केलंय. कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचं कसलंही समर्थन करणार नाही असे म्हणतानाच राणेंच्या विधानाकडे बघितलं तर परिस्थिती समजू शकतो, असंही पाटील म्हणाले.

मोदींनीच राणे यांना मंत्री केलं आहे, त्यामुळे राणेंनी केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य समजावं लागेल. त्यामुळे राणेंच्या वक्तव्याचं फडणवीस आणि पाटील समर्थन करत आहेत का? असा माझा सवाल आहे, फडणवीस आणि पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी, असंही पाटील म्हणाले.

राणेंच्या या वक्तव्याने केवळ शिवसैनिकच नाही तर राज्यातील जनताही दुखावली गेली आहे. हा आपण निवडलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे, अशी भावना लोकांची झाली आहे, ज्यावेळी मतदानाची वेळ येईल तेव्हा लोक मतपेटीतून भाजपच्या विरोधात रोष दाखविल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी जन आशीर्वाद रॅलीची पाटील यांनी खिल्ली उडवली. जन आशीर्वाद कशासाठी? पेट्रोलच्या किंमती वाढल्या म्हणून, डिझेलच्या किंमती वाढल्या म्हणून, की गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून, देशात महागाई वाढवली म्हणून असा सवाल करीत आशीर्वाद जनतेने कशासाठी द्यायचा? महाराष्ट्रातून कधी मंत्री झाले नाहीत, केंद्रीय मंत्री कधी बघितले नाही? हे सगळंच हस्यास्पद आहे असंही ना.पाटील यावेळी म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!