पवारांच्या उपस्थितीत सोलापूर मध्ये राष्ट्रवादीत इन्कमिंग !

शिवसेना, काँग्रेस, भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी त

सोलापूर : ईगल आय मीडिया

शिवसेना नेते महेश कोठे, काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या अनेक आजी माजी नगरसेवक नेत्यानी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक माजी महापौर महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्यापासून अनेक पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या जवळ आले. यावेळी आ.यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने, दिपक साळुंखे पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सोलापूर शहराच्या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकर्ता मेळाव्यात महेश कोठे यांनी अक्षरशा काँग्रेस फोडल्याचे दिसून आले. 

महेश कोठे यांनी आपल्या भाषणात, शहराच्या विकासाचे अनेक मुद्दे पवार यांच्यासमोर मांडले. युवकांच्या रोजगारासाठीआयटी पार्कची मागणी केली,  यंत्रमाग उद्योग, विडी उद्योगांना चालना, शहराचा विकास यासह उड्डाणपुला ऐवजी बायपास रस्ता करणे, पाणी प्रश्न, विमानतळाचा प्रश्न त्यांनी पवारांसमोर उपस्थित केला.

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे समर्थक सुधीर खरटमल व माजी महापौर नलिनी चंदेले यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधलेआहे. एम आय एम चे नेते नगरसेवक तौफिक शेख यांनी अधिकृत प्रवेश केला नसला तरी त्यांनी राष्ट्रवादीच्या स्टेजवर जोरदार भाषण केले.

आम्ही सध्या राष्ट्रवादीमध्ये नव्या सुना सारखे आहोत मात्र यापुढे आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला सुना प्रमाणे वागणूक न देता स्वतःच्या मुली प्रमाणे वागणूक द्या अशी मागणी कोठे यांनी पवारांपुढे केली.

कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत परिवर्तन होईल, साहेबांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानू, शहरात सध्या सर्व समाजातील कार्यकर्ते आहेत, महेश कोठे, तौफिक शेख, दिलीप माने यांच्यामुळे पक्ष मजबूत झाला आहे, निश्चित आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.

पालकमंत्री भरणे म्हणाले, अण्णा मी तुमचा पालकमंत्री मी आहे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मी असल्याने बायपासचे टेंडर झाले आहे, त्याच्या कामाचे उद्घाटन लवकरच होईल, समांतर जलवाहिनी लवकरच येणाऱ्या काळात पूर्ण केलं जाईल त्यामुळे प्रत्येक घरात दररोज पाणी मिळेल, चांगले रस्ते पहायला मिळतील त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत रहा असे आवाहन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!