धुळ्यात राष्ट्रवादी च्या मेळाव्यात घमासान

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्ते भिडले

टीम : ईगल आय मीडिया

खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी बघायला मिळाली. या हाणामारीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला. प्रदेशाध्यश्र जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि याांच्यासह यात्रा आज खान्देशात पोहोचली.

धुळ्यात मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत काही विषयांवरुन कुजबूज सुरु झाली. या कुजबूजवरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झालं.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद यात्रेच्या माध्यमातून आज संध्याकाळी धुळ्यातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. या कार्यक्रमानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि संबंध आणखी दृढ होतील, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि संबंध वाढण्याऐवजी प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.

Leave a Reply

error: Content is protected !!