नागेश फाटे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची वर्षपूर्ती


  व्यापाऱ्यांना मिठाई वाटप करून साजरा केली वर्षपूर्ती 


प्रतिनिधि : पंढरपूर         

          राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष  नागेश फाटे यांच्या पदभार स्विकृतीच्या वर्षपुर्ती दिनी व्यापार वर्गाला या विभागाच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली. तर स्व .आ .भारत  भालके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केक कापून पहिला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.  दरम्यान, नागेश फाटे यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपुर शहर व ग्रामीण भागातील विविध व्यवसायीकांसमवेत हि वर्षपुर्ती साजरी केली. 


मागील वर्षभरात नागेश फाटे यांनी आपल्या विभागाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता. या बाबतची कार्य अहवालही पक्षाचे नेते खा .शरद पवार, अजितदादा पवार, जयंतराव पाटील ,सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्याकडे पोहचविला होता. त्यावेळी नागेश फाटे यांच्या पक्ष कार्यावर वरील नेतेमंडळी नागेश फाटे यांना शाबासकी दिली होती.    गेल्या एक वर्षापासुन प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी महाराष्ट्र चा दौरा करुन दोन लाखाहुन अधिक व्यापारी आणि उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडुन दिले आहेत . शिवाय अनेक नवतरुण व्यवसाईक उभा करण्याचे कांम त्यांनी केलेले आहे .

एक वर्षांपूर्वी पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर ही जबाबदारी दिली होती. राज्यभर फिरून आपण व्यापारी, व्यावसायिक यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नवीन युवकांना व्यवसाय, व्यापाराकडे वळवण्यासाठी धोरणात्मक काम सुरू आहे. आज आमचे सरकार जरी नसले तरीही त्याच जोमाने काम करीत राहू.

 – नागेश फाटेप्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी व्यापार, उद्योग आघाडी                     

Leave a Reply

error: Content is protected !!