जयंत पाटील आखतील ‘करेक्ट कार्यक्रम’

शनिवारी प्रचाराचा नारळ फुटणार : कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

पंढरपुर : ईगल आय मीडिया

पंढरपूर पोटनिवडणूकितील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. भाजपा ने ही निवडणूक प्रतिष्टेचि केली आहे. त्यामुळे  राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील या आठवड्यात दुसऱ्यांदा पंढरपुर दौऱ्यावर येत आहेत. जयंत पाटील हे ऐनवेळी करेक्ट कार्यक्रम करण्यात तरबेज आहेत त्यामुळे शनिवारी ते कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जयंत पाटील हे उद्या दुपारी 2 वाजता कै आ. भारत भालके यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांनी सांगितले आहे. बैठक कार्यकर्त्याची असली तरी नानांच्या बांगल्यावर बसून जयंत पाटील उमेदवारी अर्ज माघारी बाबत काय काय चाल खेळतात हे पहाणे औसुक्याचे ठरणार आहे.

          उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निवडणूक जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासठी स्वता जयंत पाटील 30 मार्च ला पंढरपुरात आले होते. आता पुन्हा अवघ्या तीन दिवसात ते पुन्हा शनिवारी पंढरपुर मध्ये येत आहेत.  कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत आसे कारण देण्यात येत असले तरी खरे कारण बंडोबाना थंड करणे, व उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावून मतविभागणी टाळणे हेच आसल्याचे बोलले जात आहेत.

                             जयंत पाटील हे ऐनवेळी नवीन राजकीय समीकरणे जुळवत करेक्ट कार्यक्रम करण्यात माहिर समजले जातात. आज ते महाविकास आघाडीच्या बंडखोरांचे मतपरिवर्तन करतात का आणखी नवीन डाव टाकतात याबाबत कार्यकत्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. भाजपा ने ही निवडणूक प्रतिष्टेची करत एकास एक उमेदवार देत समाधान अवताडेंना मैदानात उतरवले आहेत. महाविकास आघाडी एकसंध आहे आणि राष्ट्रवादी अधिक सतर्क झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!