केरळ काँग्रेसचे मोठे नेते पी सी चाको यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
टीम : ईगल आय मीडिया
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचं असेल तिथं आम्ही काँग्रेससोबत आहोत. आमचा इतर राजकीय पक्षांशी संपर्क सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्राची दडपशाही सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला. दिल्लीत आज संध्याकाळी खा. शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झाला आहे.काँग्रेसमधून सातवेळा केरळात खासदार होते. आणि 6 दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.
प्रादेशिक पक्षांसाठी चांगला मंच तयार करण्याचा प्रस्ताव असल्यास त्यावर विचार करु, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारचं काम सुरु आहे असेही खा.पवार यावेळी म्हणाले. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळून आली, या संदर्भात खा.पवार म्हणाले की, त्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था चौकशी करत आहे. तपासामध्ये अडचण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आताच त्यावर काही बोलण्याची गरज नाही. कुणाची बदली करायची यावर चर्चा करत नाही. वाझे प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती असे सांगून पाच राज्यांच्या निवडणुकां पैकी फक्त आसाममध्ये भाजप विजयी होईलं असं निरीक्षणावरुन वाटलं असेही खा.पवार यावेळी म्हणाले.
केरळमध्ये राष्ट्रवादी काही वर्षांपासून एलडीएफला पाठिंबा देत आहे. डाव्या आणि लोकशाहीवादी पक्षांची युती होत आहे. केरळ काँग्रेसचे मोठे नेते पी सी चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत पी.सी.चाको यांचं पक्षात स्वागत करतो, असं खा. पवार म्हणाले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आनंद होत आहे. शरद पवार देशातील मोठे राजकीय नेते आहेत. काँग्रेसमध्ये अनेक अडचणी आल्यानं राजीनामा दिला. विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे. शरद पवार यांचा अनुभव, त्यांचा संपर्क देशातील विरोधी पक्षाला एकत्र करण्यास उपयोगी ठरेल. त्यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास मिळतोय याचा आनंद आहे. असे यावेळी पी सी चाको म्हनाले.
तर चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे केरळाच्या विधानसभा निवडणुकीत NCP ला राजकीय ताकद मिळणार आहे – राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.