
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच निवडी जाहीर झाल्या. त्यामध्ये मगरवाडी (ता. पंढरपूर) येथील तीन युवक कार्यकर्त्यांचां यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी सचिन नकाते यांची, तालुका संघटकपदी धनाजी डोंगरे यांची तर सतीश जाधव यांची तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे .
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, विठ्ठल चे चेअरमन भगीरथ भालके, युवक जिल्हा अध्यक्ष ॲड. गणेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, महिला तालुका अध्यक्ष अनिता पवार आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
मागील विधानसभा व पदवीधर निवडणुकीत या गावातून राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळाली या कार्याची दखल घेत पक्षाने नवीन तरुण कार्यकर्त्यांना संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे काम करण्याची संधी दिली. या निवडीबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे