नीरा नदीत 800 क्यूसेक्सचा विसर्ग सुरू

मंगळवारी 4 वा. वीरच्या विद्युत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

पंढरपूर : ईगल आय मीडिया
यंदाच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच नीरा नदीत धरणातून पाणी सोडण्यात येत असून मंगळवारी वीर धरणावर असलेल्या वीज निर्मिती प्रकल्पातून नीरा नदीला 800 क्यूसेक्स ने पाणी सोडले आहे अशी माहिती नीरा उजवा कालवा विभागकडून देण्यात आली.
यंदाच्या हंगामात नीरा नदीच्या खोऱ्यात अत्यल्प पाऊस असल्याने वीर,भाटघर, नीरा देवघर धरणे संथगतीने भरत आहेत. मंगळवारी सकाळी वीर धरण 94 टक्के तर भाटघर धरण 69 टक्के भरले आहे. तुरळक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 5 हजार क्यूसेक्स असून वीर धरण 100 टक्केच्या उंबरठ्यावर आले आहे.त्यामुळे मंगळवारी दु 4.00वाजता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये 800
क्यसेक्स विसर्ग विद्युतगृहातुन सुरू करण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात प्रथमच धरणातून नीरा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. धरणातील येवा 5000 cusecs आहे. नीरा उजवा आणि डावा या दोन्हीही कालव्यातून सध्या पाणी सोडणे बंद केलेले आहे अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!